नाशिक वसंत व्याख्यानमालेस महाराष्ट्र दिनापासून सुरुवात ; मधुकर भावे, सुधींद्र कुलकर्णी, माणिक खुळे यांचाही समावेश

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानिबदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमाला या संस्थेच्या वतीने ९९व्या ज्ञानसत्राचा आरंभ महाराष्ट्र दिनापासून रविवारी गोदाकाठावर होत आहे.

नाशिक : नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानिबदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमाला या संस्थेच्या वतीने ९९व्या ज्ञानसत्राचा आरंभ महाराष्ट्र दिनापासून रविवारी गोदाकाठावर होत आहे. महिनाभर चालणाऱ्या या व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी, विचारवंत मधुकर भावे, हवामानतज्ज्ञ माणिक खुळे, अर्थविषयक अभ्यासक अॅकड. कांतिलाल तातेड यांसह इतरांचे मार्गदर्शन होणार आहे. व्याख्यानमालेची वेळ सायंकाळी सातची आहे.
रविवारी सायंकाळी ७.०० वाजता देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे ज्येष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने यंदाच्या व्याख्यानमालेची सुरुवात होणार आहे. मालेचे उद्घाटन महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित राहाणार आहेत. कुलकर्णी हे ‘अखंड भारत नव्हे-२०४७ पर्यंत भारत-पाकिस्तान-बांगलादेशसहित एशिया महासंघ’ आणि या महान उद्दिष्टासाठी हिंदूू मुस्लीम एकतेची गरज या विषयावर मार्गदर्शन करतील. २ मे रोजी रेखा महाजन यांचा गीतांचा कार्यक्रम, ३ मे रोजी आयर्नमॅन प्रशांत डबरी, मिहद्र छोरिया, अरुण गचाले, किशोर घुमरे यांच्याशी संवाद, ४ मे रोजी अॅ ड. कांतिलाल तातेड यांचे ‘भारतीय वित्तीय संस्थांचे खासगीकरण जनतेच्या हिताचे आहे काय’, या विषयावर व्याख्यान होईल. ५ मे रोजी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या संचालक नीलिमा पवार यांचे ‘बहुजनांचे उद्धारक- छत्रपती शाहू महाराज’, ६ मे रोजी अशोक देशमुख यांचे ‘आनंदी कुटुंबाचे रहस्य’, ७ मे रोजी ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांचे ‘महाराष्ट्र काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होईल. ८ मे रोजी माणिक खुळे यांचे ‘हवामान भाकिते आणि शेती पिकांचे नियोजन’, ९ मे- सुनील देवधर यांचे ‘आत्मनिर्भर भारत आणि हिंदूुत्व’, १० मे रोजी अमोल यादव यांचे ‘मेक इन इंडिया’, ११ मे रोजी डॉ. विधी नागर यांचे ‘समाज में प्रदर्शनात्मक कलाओंका स्थान’, १२ मे रोजी शुभांगी पासेबंद यांचे ‘मुलीही जन्माला येऊ द्या’, १३ मे रोजी जीवन विद्या मिशनचे विश्वस्त संतोष तोतडे यांचे ‘पर्यावरण हाच नारायण’, १४ मे रोजी शिवचरित्रकार सोपान वाटपाडे यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज’, १५ मे रोजी हुसेन बंदी इमाम यांचे ‘अध्यात्मद्वारा तणावमुक्ती’, १६ मे रोजी प्रा. राजेंद्र देशमुख यांचे ‘संस्कार. कल्पना आणि वास्तव’, १७ मे रोजी धनराज दायमा यांचे ‘पोलीस-जनता, एकमेकांबद्दल अपेक्षा’, १८ मे रोजी डॉ. विनोद गोरवाडकर यांचे ‘सरस्वतीची लेक- शांता शेळके’, १९ मे रोजी आ. सुधीर तांबे यांचे ‘जनतेची सनद’, २० मे रोजी श्रीधर साळुंके यांचे ‘मानवी जीवनात संवादाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल.
व्याख्यानमालेच्या अखेरच्या सत्रात २१ मे रोजी संदीप तापकीर यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील किल्ल्यांचे स्थान’, २२ मे रोजी नाशिकमधील कवींचे काव्यसंमेलन, २३ मे रोजी सत्यनारायण शर्मा यांचे ‘ब्रह्मविद्या आध्यात्मिक श्वसनाचे तंत्र’, २४ मे रोजी सुरेश कापडिया यांचे ‘पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने झालेला हवामानातील बदल आणि झपाटय़ाने होत असलेली जागतिक पाणीटंचाई आणि त्यावर उपाय’, २५ मे रोजी प्रा. प्रीतिश कुलकर्णी यांचे ‘आध्यत्मिक अनुभूती उपासना आणि तोडगे’, २६ मे रोजी डॉ. शैलेश गुजर यांचे ‘आयुर्वेद शतायुषी जीवनशैली’, २७ मे रोजी एल. के. कुलकर्णी यांचे ‘विश्वाची उत्पत्ती -वैज्ञानिक सिद्धांत’ २८ मे रोजी मयूर भावे यांचे ‘सावरकर एक महाकाव्य’, २९ मे रोजी व्यंगचित्रकार अविनाश जाधव यांचे प्रात्यक्षिक, ३० मे रोजी अक्षय मुधवाडकर यांची प्रा. यशवंत पाटील, प्रशांत गाडगीळ मुलाखत घेतील. व्याख्यानमालेचा समारोप संगीत रजनीने होणार आहे. व्याख्यानमालेस नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.