नाशिक: सारं काही पाण्यासाठी; धरण परिसरातील वीज पुरवठा खंडित

पावसाअभावी दुष्काळाचे संकट घोंघावत असताना पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नाशिक – पावसाअभावी दुष्काळाचे संकट घोंघावत असताना पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अतिशय कमी पर्जंन्यमान झालेल्या नांदगाव तालुक्यातील माणिकपूंज आणि नागासाक्या या धरणांतील मृतसाठ्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने थेट या धरण परिसरातील वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित ,करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव