‘नासा’कडून सई जोशीची नागरी वैज्ञानिक म्हणून निवड

आठवडाभर वेधशाळेने या संभाव्य लघुग्रहांचा अभ्यास केला.

नाशिक : शहरातील खगोल मंडळाची सदस्य सई जोशी हिची नासातर्फे  नागरी वैज्ञानिक (सिटीझन सायंटिस्ट) म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नासा संस्थेच्या वतीने जूनमध्ये लघुग्रह संशोधनासाठी नागरी वैज्ञानिक प्रकल्प आयोजित के ला होता. हा प्रकल्प नासाकडून अनुदानित आहे. त्यात खगोल मंडळाची सभासद असलेली सई हिने भाग घेतला होता.

तिने केलेल्या संशोधनामध्ये सहा लघुग्रहांचा शोध नासा आणि हवाई वेधशाळेतर्फे  अधिकृतपणे मान्य झाला आहे. सईसोबत १३ जणांचा गट बनविण्यात आला होता. या प्रकल्पात पहिल्या पाच दिवसांमध्ये संशोधन कसे करायचे, याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. प्रकल्पामध्ये अमेरिके तील स्टार वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीचा सॉफ्टवेअरच्या मदतीने अभ्यास के ला गेला.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

निवडलेल्या गटातील प्रत्येक व्यक्तीने महिनाभर सात कृतींचा अभ्यास के ला आणि सुमारे ५० संभाव्य लघुग्रहांची यादी नासाच्या आंतरराष्टीय खगोलीय शोध सहयोग संस्थेला दिली. त्यानंतर आठवडाभर वेधशाळेने या संभाव्य लघुग्रहांचा अभ्यास केला.

त्यापैकी सहा नवीन लघुग्रहाचे संशोधन निश्चिात के ले. ते अधिकृत शोध म्हणून जाहीर के ले. यापुढे सहा ते १० वर्षामध्ये नासामधील शास्त्रज्ञ या लघुग्रहाची कक्षा, त्यांचे पृथ्वीपासून अंतर, त्यांची रचना अशा अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणार आहेत.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

एस्टॉन अ‍ॅरा संस्थेच्या माध्यमातून या स्पर्धेची माहिती समजली. फरिदाबाद येथील अ‍ॅस्टोफिनाटिकमध्ये या विषयी महिनाभर प्रशिक्षण घेतले. यामध्ये प्रत्येक गटाने सात कृतींचा अभ्यास केला. ५० लघुग्रहाची संभाव्य यादी दिली असून सहा लघुग्रहांवर अभ्यास सुरू आहे.  – सई जोशी