नौदलाचे एलिट कमांडोज मार्कोस लडाखमध्ये, चीनला पाण्याखालून हल्ल्याची भीती

चीनचे पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही लक्ष

भारत आणि चीन दोघांनी इथे मोठया प्रमाणावर सैन्याची आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती केलीय. अत्याधुनिक रणागाडे, फायटर जेट, लढाऊ हेलिकॉप्टरसह भारताने या भागात स्पेशल फोर्सेसही तैनात केल्या आहेत. पँगाँग टीएसओच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या टेकड्यांचा ताबा SSF कमांडोजकडे असताना, भारताने आता मार्कोस कमांडोजनाही लडाखला पाठवण्याचा निर्णय घेतलाय.भारत आणि चीनमध्ये पँगाँग टीएसओच्या परिसरावरुन मुख्य वाद आहे. चीन इथल्या फिंगर फोर भागातून मागे हटायला तयार नाहीय. चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा