पीएम स्वनिधी अंतर्गत २७ हजार पथ विक्रेत्यांना कर्जवाटप

महानगरपालिका कार्यक्षेत्रात व्यवसाय करणारे व ज्यांनी अद्यापपर्यंत पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा सर्व पथविक्रत्यांना (छोटे व्यवसायिक) या योजनेचा लाभ घेता येईल.

नाशिक : केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत शहरात तीन टप्प्यात आतापर्यंत एकूण २७ हजार १९२ पथ विक्रेत्यांना ३४ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्ज बँकांमार्फत वितरित करण्यात आले आहे. या योजनेसह समृध्दी योजनांचा पथ विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश