पुणे-नाशिक रेल्वे प्रवास दोन तासांत

अर्थसंकल्पात तरतूद आणि मंत्रिमंडळाची मान्यता

अर्थसंकल्पात तरतूद आणि मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई : पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने सध्या सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागत असतानाच आता हाच वेळ पावणेदोन तासांवर येणे शक्य होणार आहे. या दोन शहरांतील सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अर्थसंकल्प मांडताना दिली.

‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉपरेरेशन लिमिटेड’कडून (एमआरआयडीसीएल)हा प्रकल्प पूर्ण के ला जाणार आहे. प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे दोन शहरांतील प्रवास वेगवान होतानाच मालवाहतुकीसाठीही या मार्गाचा वापर के ला जाणार आहे.

१० फे ब्रुवारी २०२० ला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प एमआरआयडीसीएलने मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला होता. जून २०२० मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीनंतर प्रकल्पाला गती देण्याचे काम करण्यात येत होते. परंतु करोनामुळे लागलेली टाळेबंदीमुळे प्रकल्पाचे काम काहीसे लांबणीवर पडले. प्रकल्पानुसार सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग २३५.१५ किलोमीटरचा असून दोन मार्ग बनवण्यात येतील. ब्रॉड गेज बनवण्यात येणाऱ्या या मार्गावरून प्रति तास २०० किलोमीटर वेगाने गाडी धावेल. याचा वेग जास्तीत जास्त प्रतितास २५० किलोमीटपर्यंत जाऊ शकतो. पुण्यातून धावतानाच अहमदनगर, नाशिक अशा तीन जिल्ह्यांतून ही रेल्वे धावेल. प्रकल्पामुळे उद्योग व पर्यटनालाही चालना मिळणार आहे. प्रकल्पाची

हे वाचले का?  Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

किं मत १६ हजार ३९ कोटी रुपये आहे. नागपूर शहर, वर्धा, रामटेक, भंडारा रोड व नरखेड ही ब्रॉम्डगेज मेट्रो, नाशिक मेट्रो, ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प ही कामे हाती घेण्यात आली आहेत.

जलदगती मार्ग..

’ सध्या पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नाही. त्यामुळे पुणे किं वा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. परिणामी रेल्वे प्रवास सहा तासांपेक्षा जास्त जातो. त्यामुळे हायस्पीड संकल्पना अमलात.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

’हायस्पीड रेल्वे पुणे रेल्वे स्थानकातून सुटताच ती हडपसपर्यंत उन्नत मार्गावरून धावेल. त्यानंतर हडपसर ते नाशिक रेल्वे स्थानकापर्यंत जमिनीवरून धावणार आहे.

’या रेल्वेला चाकण, मंचर, नारायण गाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक येथे थांबा.

’यासाठी नवीन पुणे रेल्वे स्थानक करताना अनेक सोयीसुविधा उपलब्ध के ल्या जाणार आहेत.

’सुरुवातीला हायस्पीड रेल्वे सहा डब्यांची धावेल. हे डबे हळूहळू १२ आणि १६ डब्यांपर्यंत वाढवू शकतो.

’या मार्गावर ६.६४ किलोमीटरचा एक मोठा बोगदा आणि एकू ण २१ किलोमीटर लांबीचे एकू ण १८ छोटे बोगदे असतील.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

– पुणे ते नाशिक असा हायस्पीड नवीन रेल्वे मार्ग बनवल्यामुळे त्याचा मालवाहतुकीसाठीही वापर करण्याचा प्रयत्न. त्यामुळेच या मार्गावर १३ क्रॉसिंग स्थानक बनवण्यात येतील.