‘पुन्हा टाळेबंदीची वेळ आणू नका’

निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

मुंबई : जगातील काही देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा टाळेबंदी करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागेल. जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, उपनगरी रेल्वेसेवा आणि व्यायामशाळांबाबत आपण अजून निर्णय घेतला नाही. सुरू केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही. त्यामुळे शिस्त पाळा, असे आवाहन करत पुन्हा टाळेबंदीची वेळ येऊ देऊ नका, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्य सरकार करत असलेली विविध कामे, टाळेबंदीतून शिथिलता देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आदींची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली. आतापर्यंत सर्व धर्मियांनी जसे सगळे सण-समारंभ साधेपणाने साजरे केले, तसेच येणारे नवरात्र आणि दसरा, दिवाळी हे सणही साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी के ले. उपनगरी रेल्वेसेवा लगेचच सर्वासाठी खुली करणे शक्य नाही, व्यायामशाळा सुरू करण्याबाबतही नियमावली करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट के ले. मुखपट्टीचा वापर, हात धुणे आणि अंतरनियम पाळणे या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करा. सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्या, याचा पुनरुच्चार करत ‘मास्क हाच आपला ब्लॅक बेल्ट’ असल्याचे ठाकरे म्हणाले.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

राज्यात विविध भागांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आपण मदत केली आहे. विदर्भात अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यांना मदत करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. आता सतत पडणाऱ्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी चिंता न करता निश्चिंत राहावे, शासन त्यांना त्यांची नुकसानभरपाई देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शासनाने महाओनियनचे सहा प्रकल्प राज्यात सुरू केले. केवळ कांद्यांसाठीच नाही तर कापूस, तूर, मूग अशा विविध शेतपिकांसाठी साठवणुकीची व्यवस्था उभी करत आहे. के ंद्रीय कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धय़ांच्या कामाचा यावेळी गौरव केला. अनेक नागरिक अजूनही भीतीपोटी वेळेत उपचाराला येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. करोनाची शंका आल्यास चाचणी करा, वेळेत उपचारासाठी पुढे या, लगेचच उपचार घेतल्यास स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जीवाचा धोका आपण टाळू शकतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद के ले. माझे कुटुंब- माझी जबाबदारी या अभियानात आतापर्यंत १ कोटी १८ लाख ५६ हजार कुटुंबांना भेट देऊन त्यांची आरोग्य तपासणी झाल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य तपासणीसाठी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”

कारशेड आता कांजूरमार्गला

’गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आरे कारशेडचा वाद संपुष्टात आणणारी घोषणा मुख्यमंत्र्यांनी रविवारी केली.

’सुमारे २३ हजार कोटी रूपये खर्चाच्या आणि ३३.५ किमी लांबीच्या कु लाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३चे आरेतील कारशेड रद्द करीत ही जागा राखीव वन म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.

’पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य नसल्याने सांगत आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला, आहे. असे आदेशही मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

’मात्र, या निर्णयामुळे नवा वाद निर्माण होण्याची तसेच कारशेडच्या ठिकाणात बदल झाल्याने प्रकल्पही रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टाळेबंदीचे निर्बंध टप्प्याटप्प्याने हटविण्यात येतील. व्यायामशाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. उपनगरी रेल्वे प्रवासही कळीचा मुद्दा आहे. मात्र, तिथली गर्दी हा फार महत्त्वाचा मुद्दा असून, लवकरच याबाबतही निर्णय घेऊ. निव्वळ जबाबदारीच नव्हे, तर जनतेवरील प्रेमापोटीच कुठेही घाईगडबड न करता आम्ही काळजीपूर्वक पावले पुढे टाकतो आहोत.

      – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री