बकरी ईदसाठी नियम शिथिल केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं केरळ सरकारकडे मागितलं उत्तर

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं केरळ सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

केरळच मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शुक्रवारी करोनासंदर्भातील नवीन नियमांची घोषणा केलीय. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं केरळ सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली असून कोर्टानं केरळ सरकारकडून उत्तर मागितलं आहे. आता या प्रकरणावर उद्या (मंगळवार) सुनावणी होणार आहे. सध्या या निर्णयावर कोणतंही मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं नाही. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनं कावड यात्रा रद्द केल्यानं त्या संदर्भातील याचिका बंद करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

‘बकरी ईद’च्या कालावधीमध्ये करोनाची परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारने नियमांमध्ये सूट दिल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते असं आयएमएचं म्हणणं आहे. देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असणाऱ्या आयएमएनं केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असतानाही सरकारने दिलेली निर्बंधांमधील सूट चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ही सूट दिल्याने राज्यात करोनाचं संकट अधिक गडद होण्याची चिन्ह असल्याचे संकेत एमआयएनं दिले आहेत.

बकरी ईदनिमित्त जास्तीत जास्त ४० जणांना एका जागी जमण्यास परवानगी देण्यात आलीय. मात्र या ४० जणांनी लसीचा किमान एक डोस घेणं बंधनकारक आहे. केरळ सरकारने तीन दिवसांची सूट वगळता विकेण्ड लॉकडाउन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलाय. २० तारखेला बकरी ईद आहे. या नवीन नियमांमुळे वाद निर्माण झाला असून अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

गेल्या २४ तासात देशात ३८ हजार १६४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख २१ हजार ६६५ वर पोहोचली आहे. देशात काल दिवसभरात ३८ हजार ६६० रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे देशातल्या करोनामुक्तांची संख्या आता तीन कोटी तीन लाख ८ हजार ४५६ झाली आहे. तर देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.३२ टक्क्यांवर स्थिरावला आहे.

हे वाचले का?  पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक