‘कंट्रोल सिस्टीम’सह नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या क्षेपणास्त्राचे चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून सकाळी १०.४५च्या सुमारास चाचणी प्रक्षेपण करण्यात आले
बालासोर : ‘ब्रह्मोस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची भारताने गुरुवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ यशस्वी चाचणी केली. ‘कंट्रोल सिस्टीम’सह नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या क्षेपणास्त्राचे चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून सकाळी १०.४५च्या सुमारास चाचणी प्रक्षेपण करण्यात आले, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) एका सूत्राने दिली. या चाचणीच्या तपशिलांचे विश्लेषण करण्यात येत असल्याचेही तो म्हणाला.