भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ व्हावेत -ऑस्टिन

अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी शुक्रवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी शुक्रवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि भरभराट होण्यासाठी अमेरिकेची भारतासमवेत अधिकाधिक काम करण्याची इच्छा असल्याचे ऑस्टिन यांनी मोदी यांच्याकडे स्पष्ट केले.

मोदी यांनी या वेळी दोन्ही देशांमधील भागीदारीबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला आणि भारत-अमेरिका संबंधांमध्ये संरक्षणविषयक परस्पर सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचवाव्या, असे या वेळी मोदी यांनी ऑस्टिन यांना सांगितले.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

ऑस्टिन संरक्षणमंत्री या नात्याने प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. बायडेन यांनीही आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत, असे ऑस्टिन यांनी मोदी यांना सांगितले.

शेतकरी आंदोलन : सेनेटर्सचे ब्लिंकन यांना साकडे

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सेनेटचे परराष्ट्र समिती अध्यक्ष बॉम्ब मेन्डेझ आणि बहुसंख्याक नेते चक शुमर यांनी परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले  आहे की, शेतकरी आंदोलनाचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्याकडे उपस्थित करावा. ते तीन कायद्यांबाबत शांततेने निदर्शने करीत आहेत.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार