मणिपूरमध्ये सौहार्द निर्माण करू! काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा विश्वास, भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ

मणिपूरच्या जनतेच्या वेदना आम्ही समजतो. त्यांना ज्या बिकट परिस्थितीतून जावे लागत आहे त्याची कल्पना असून, राज्यात शांतता व सौहार्द आम्ही पुन्हा आणू असा निर्धार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

पीटीआय, थौबल (मणिपूर)

मणिपूरच्या जनतेच्या वेदना आम्ही समजतो. त्यांना ज्या बिकट परिस्थितीतून जावे लागत आहे त्याची कल्पना असून, राज्यात शांतता व सौहार्द आम्ही पुन्हा आणू असा निर्धार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरच्या दक्षिणेकडील थौबल येथून करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.

राज्यात मोठय़ा प्रमाणात जिवित व वित्त हानी झाली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला दिलासा देण्यासाठी आले नाही. कदाचित मोदी तसेच भाजप किंवा संघाला मणिपूर हे भारतात आहे असे वाटत नसावे असा आरोप राहुल यांनी केला. या यात्रेच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. ईशान्येकडील राज्यांत पंतप्रधान केवळ मतांसाठी येतात. मात्र येथील नागरिक अडचणीत असताना विचारपूस करण्यासाठी आले नाहीत असा आरोप खरगेंनी पंतप्रधानांवर केला. समुद्रकिनारी जाण्यासाठी त्यांना वेळ आहे, मात्र मणिपूरसाठी नाही असा टोलाही खरगेंनी लगावला. भाजप हा धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करत असून जनतेच्या भावना भडकावत असल्याची टीका खरगेंनी केली.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

या यात्रा ६,७१३ किमी अंतर जाणार आहे. त्यात लोकसभेच्या १०० मतदारसंघांचा समावेश असून, ११० जिल्ह्यांतून विधानसभेच्या ३३७ मतदारसंघांतून तीचा प्रवास असेल. ६७ दिवसांनंतर २० मार्चला मुंबईत या यात्रेचा समारोप होईल.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची यात्रेवर टीका

मणिपूरमध्ये आता यात्रा आयोजित करण्याची ही वेळ आहे काय? असा सवाल मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी केला आहे. राज्यातील परिस्थिती सुधारत असताना राहुल गांधी अधिक गोंधळ निर्माण करण्यासाठी ते येत आहेत काय? अशी टीकाही बिरेन सिंह यांनी केली. बिरेन हे भाजपचे नेते असून, त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर टीका केली.

हे वाचले का?  Olympics 2024 : भारताला आज तीन पदकांची आशा; महाराष्ट्राचा नेमबाज अंतिम फेरीत, चालण्याच्या स्पर्धेत तिघांची फायनलमध्ये धडक

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची यात्रेवर टीका

मणिपूरमध्ये आता यात्रा आयोजित करण्याची ही वेळ आहे काय? असा सवाल मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी केला आहे. राज्यातील परिस्थिती सुधारत असताना राहुल गांधी अधिक गोंधळ निर्माण करण्यासाठी ते येत आहेत काय? अशी टीकाही बिरेन सिंह यांनी केली. बिरेन हे भाजपचे नेते असून, त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर टीका केली.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल