मनमाड: पाच, सहा डिसेंबरला रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक; ३८ गाड्या रद्द, प्रवासी संतप्त

मुंबईतील २७ तासांचा मेगाब्लॉक संपल्यानंतर आता डिसेंबरमध्ये पुन्हा दोन दिवस रेल्वे प्रवाशांना मेगा ब्लॉकला सामोरे जावे लागणार आहे.

तत्पुर्वी म्हणजे चार आणि सहा डिसेंबरला नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे. जबलपूर-पुणे एक्स्प्रेस, तसेच पाच व सहा डिसेंबर रोजी देवळाली- भुसावळ शटल, भुसावळ-देवळाली शटल, भुसावळ- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. या शिवाय अमृतसर-नांदेड ही गाडी चार व पाच तारखेला खंडवा, भुसावळ, अकोलामार्गे धावणार आहे. निजामुद्दीन अर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ही गाडी चार डिसेंबरला बिना, रतलाम, बडोदामार्गे धावणार आहे. रामेश्वरम-ओखा ही गाडी २५ नोव्हेंबर व दोन डिसेंबरला या दिवशी अंकाई, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसईमार्गे धावणार आहे.

हे वाचले का?  नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

मध्य रेल्वेने पाच आणि सहा डिसेंबरला भुसावळ ते जळगाव दरम्यान घेतलेला मेगा ब्लॉक त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा रेल रोको आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) शहर शाखेने दिला आहे. याबाबतचे निवेदन महाप्रबंधकांना पाठविण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपरोक्त दिवशी देशभरातून आंबेडकरी अनुयायी मुंबई-दादर चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी जात असतात. याच काळात रेल्वेने मेगाब्लॉक घेऊन ३८ प्रवाशी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित