“मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी”

सगळी सत्व परीक्षा मराठा समाजानेच द्यावी अशी भूमिका काही विचारवंतांनी घेतली असून हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळी मराठा समाज समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे. अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. MPSC मध्ये यशस्वी होणारे तरुण केवळ एक टक्का आहेत. खासगी क्षेत्रात तरुणांना संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. बंद असलेली सारथी संस्था पुन्हा मजबूत करावी अशीही मागणी यावेळी राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत