मराठीला अभिजात भाषेचा दर्जा : शिंदे गटाचा पाठपुरावा

लोकसभेत शिवसेनेचे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांना मान्यता दिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या शिष्टमंडळाने शहा यांची भेट घेतली.

नवी दिल्ली : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, अशी मागणी करणारे पत्र शfxदे गटातील खासदारांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनामध्ये भेट घेऊन दिले. लोकसभेत शिवसेनेचे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांना मान्यता दिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या शिष्टमंडळाने शहा यांची भेट घेतली.

अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या संदर्भातील निकष पूर्ण करण्यासाठी २०१२ मध्ये रंगनाथ पाठारे समिती नेमण्यात आली होती व २०१३ मध्ये या समितीचा अहवालही केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात तत्कालीन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती व या विषयाचा पाठपुरावा केला होता.

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

आता राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे गट-भाजप युतीच्या सरकारनेही मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आणला असून शिंदे गटातील खासदारांनी शहा यांची भेट घेतली. वास्तविक, मराठी भाषेप्रमाणे अन्य भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णय प्रलंबित आहे. अन्य भाषांसंदर्भात निर्णय होत नसल्याने मराठीसंदर्भातही केंद्र सरकारने निर्णय घेतलेला नाही, मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे वाचले का?  भारत-चीन सीमावाद : देप्सांग आणि देम्चोक भागातून सैन्य मागे प्रक्रिया पूर्ण; भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार