महात्मा गांधी असामान्य -जॉन्सन

साबरमती आश्रमाला भेट देणारे ते पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत.

अहमदाबाद : महात्मा गांधी हे असामान्य व्यक्ती होते. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वाने जगात चांगला बदल घडविण्यासास चालना दिली, असे गौरवोद्गार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या साबरमती दौऱ्यात काढले.

साबरमती आश्रमाला भेट देणारे ते पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. तसे पाहता १९४७ नंतर गुजरातला भेट देणारे ते पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. ते म्हणाले की, या असामान्य माणसाच्या आश्रमात येणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. त्यांनी जग बदलण्यासाठी सत्य- अहिंसेचे साधे तत्त्व कसे वापरले हे समजून घेता आले. आश्रमातील  नोंदवहीत त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!