महाराष्ट्रातील परिस्थिती अस्वस्थ करणारी; सरकारचा CBIवर तर परमबीर सिंह यांचा पोलीस दलावर विश्वास नाही- सुप्रीम कोर्ट

तुम्हाला पुरेसे संरक्षण दिले आहे आता आम्ही आणखी संरक्षण देणार नाही, असे खंडपीठाने परमबीर सिंह यांना सांगितले

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कठोर टीका करत महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत अस्वस्थ करणारी आहे असे म्हटले आहे. महाराष्ट्रात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा स्वतःच्या पोलीस दलावर विश्वास नाही आणि राज्य सरकारचा केंद्रीय तपास संस्थेवर विश्वास नाही, अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. परमबीर सिंह यांच्या वकिलाने न्यायमूर्ती एसके कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाला, राज्य पोलीस विभागीय प्रकरणांमध्ये त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितल्यानंतर खंडपीठाने ही टिप्पणी केली.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

“राज्य सरकारला या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा असे वाटत नाही आणि त्यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, परंतु ते तसे करू शकले नाहीत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून संबंधित खंडपीठाचे मत काय असेल हे आम्हाला माहीत नाही. आम्ही तुम्हाला पुरेसे संरक्षण दिले आहे आणि आता आम्ही आणखी संरक्षण देणार नाही,” असे खंडपीठाने म्हटले.

यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयची बाजू मांडताना भीती व्यक्त केली की राज्य सरकार काही पावले उचलू शकते ज्यामुळे तपास पूर्ण करण्याचे तपास यंत्रणेचे काम कठीण होऊ शकते. त्यांनी खंडपीठाला सांगितले की सीबीआयने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे आणि महाराष्ट्र पोलिसांनी सिंग यांच्यावर नोंदवलेल्या एका गुन्ह्याचा तपास घेण्यास तयार आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?

परमबीर सिंह यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील पुनीत बाली यांनी म्हटले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांना लक्ष्य केले जात आहे आणि राज्य सरकार सीबीआय प्रकरणाच्या तपासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वोच्च न्यायालय आता २२ फेब्रुवारीला या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.