महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर दुप्पट अपघात ! मुंबई, पुण्यात सर्वाधिक मृत्यू

महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांवर १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ दोन महिन्यात दुप्पट अपघात होऊन मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत.

नागपूर : राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांवर १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ दोन महिन्यात दुप्पट अपघात होऊन मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपघाताची आकडेवारी एकत्र केल्यास या काळात २ हजार ८०२ अपघातात १ हजार ४१८ मृत्यू झाले.

राज्यात १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राज्य महामार्गावर ९८४ अपघातात ५१८ नागरिकांचा तर राष्ट्रीय महामार्गावर १ हजार ८१८ अपघातात ९०० नागरिकांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी बघता महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर जवळपास दुप्पट अपघात व मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

नागपूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर, छत्रपती संभाजीनगर शहर या चार शहरांची १ जानेवारी २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ दरम्यानची अपघातांची आकडेवारी बघता सर्वाधिक २ हजार ८९२ अपघातात मुंबईत ४२६ नागरिकांचा मृत्यू झाला. नागपुरात १ हजार ४२६ अपघातात ३८२ मृत्यू, पुण्यात १ हजार ४७१ अपघातात ४१३ मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७०८ अपघातात २३४ मृत्यू झाले.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

छोट्या वाहनांच्या अपघतात मृत्यू अधिक

राज्यात २०१९ मध्ये बसच्या १ हजार ११० अपघातात २४६ मृत्यू तर कार, टॅक्सी, व्हॅन व हलक्या वाहनांच्या ३ हजार २७३ अपघातात १ हजार ५७६ मृत्यू झाले. ट्रक, लॉरीच्या १ हजार ९६४ अपघातात ६२७ मृत्यू झाले. २०२० मध्ये बसच्या ३५४ अपघातात १०६ मृत्यू तर कार, टॅक्सी, व्हॅन, हलक्या वाहनांच्या ३ हजार २७३ अपघातात १ हजार ५७६ मृत्यू झाले. ट्रक, लॉरीच्या १ हजार ९६४ अपघातात ६२७ मृत्यू झाले. २०२२ मध्ये बसच्या ४८३ अपघातात ११९ मृत्यू तर कार, टॅक्सी, व्हॅन व हलक्या मोटार वाहनांच्या ५ हजार ४५ अपघातात २ हजार २२१ मृत्यू झाले. ट्रक, लॉरीच्या १ हजार ७६२ अपघातात ८०६ मृत्यू झाले.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा