महिला आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य; पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, शरद पवार यांचे प्रतिपादन

महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी नाइलाजाने पाठिंबा दिला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणादरम्यान करीत आहेत.

मुंबई : महिला आरक्षणाच्या विधेयकाला दोन सदस्य सोडले तर संसदेत कोणीही विरोध केला नाही. विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी नाइलाजाने पाठिंबा दिला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणादरम्यान करीत आहेत. पंतप्रधानांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. महिला आरक्षणाला आम्ही सर्व पक्षांनी मनापासून पाठिंबा दिला आहे, असे परखड प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. महिला आरक्षणाचा विचार काँग्रेसने यापूर्वीच केला होता आणि महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे  पहिले राज्य असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?