माेदींच्या दाैऱ्यामुळे चीन अस्वस्थ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सीमा भागाचा दौरा केल्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे. सीमेवर परिस्थिती जटिल होईल, अशी पावले कोणी उचलू नयेत, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शुक्रवारी अचनाक लेह दाैरा केला. यावेळी चीनचे नाव न घेता विस्तारवादाचे धाेरण राबवणाऱ्या शक्तींचा विनाश झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. माेदींच्या या दाैऱ्याचा चीनला चांगल्याच मिरच्या झाेंबल्या आहे. चीनचे प्रवक्ते झाओ म्हणाले, भारताने चीनवर चुकीच्या पद्धतीने अनुमान लावू नयेत. भारत द्विपक्षीय संबंध टिकवण्यासाठी चीनसोबत मिळून काम करेल, अशी आमची अपेक्षा आहे.