मुंबईसह राज्यात मोठी रुग्णघट

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड लाखाच्या खाली आली आहे.

तीन महिन्यांतील सर्वात कमी रुग्णनोंद

मुंबई : करोनाची दुसरी लाट वेगाने ओसरत असून, सोमवारी मुंबईसह राज्यात मोठी रुग्णघट नोंदविण्यात आली. राज्यात सोमवारी ८ हजार १२९ रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील ५२९ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येने तीन महिन्यांतील नीचांक नोंदवला आहे. दिवसभरात १४ हजार ७३२ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत २०० रुग्णांचा मृत्यू झाला.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड लाखाच्या खाली आली आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्य़ात सर्वाधिक ११३१ रुग्णांची नोंद झाली. सांगलीत ६६६, पुणे ग्रामीण ४६०, रत्नागिरी ६५७, साताऱ्यात ५९९ तर मुंबईत ५२९, पुण्यात ४६० नव्या बाधितांची नोंद झाली.

देशात ७०,४२१ नवे करोनाबाधित

’देशभरात गेल्या २४ तासांत करोनाचे ७०,४२१ रुग्ण आढळले. गेल्या ७४ दिवसांतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णवाढ आहे. देशात दिवसभरात ३९२१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

हे वाचले का?  Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

’करोनाबळींची एकूण संख्या ३,७४,३०५ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या दहा लाखांखाली आहे. देशभरात सध्या ९,७३,१५८ जणांवर उपचार सुरू आहेत.

’एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत हे प्रमाण ३.३० टक्के आहे; तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढून ९५.३३ टक्के झाले आहे.