मुखपट्टीविना फिरण्यास पसंती; करोनाविषयक नियमांकडे दुर्लक्ष

जिल्ह्यात आतापर्यंत करोनाग्रस्त रुग्णांनी एक लाखाचा टप्पा पार के ला आहे. राज्यात काही ठिकाणी संचारबंदी लागु करण्यात आली आहे.

नाशिक : करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. करोनाविषयक नियमांची अमलबजावणी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत असले तरी करोनाचे कोणतेही भय न बाळगता आणि नियम, निर्बंध झुगारण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. मुखपट्टीविना फिरणाऱ्यांची संख्या शहरात कितीतरी अधिक आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ग्राहक, दुकानदार, भाजीपाला विक्रेते, प्रवासी अशा सर्वांचा नियम न पाळणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोनाग्रस्त रुग्णांनी एक लाखाचा टप्पा पार के ला आहे. राज्यात काही ठिकाणी संचारबंदी लागु करण्यात आली आहे. शहरातही पोलिसांनी  रात्रीची संचारबंदी लागू के ली असून मंगल कार्यालयांतील उपस्थितीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. संचारबंदीचे कोणी उल्लंघन करू नये म्हणून पोलिसांना रात्र जागावी लागत असतांना सकाळपासून अनावश्यक कामांसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मात्र वाढत आहे.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू झाली. शाळांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे तापमान नोंद, हात निर्जंतुकीककरण असे उपाय के ले जातात. वर्गातही के वळ २५ मुलांना बोलावण्यात येत असतांना काही विद्यार्थी गैरहजर असल्याने वर्ग एकत्रित के ले जातात. महाविद्यालय सुरू होऊन आठवडाही होत नाही तोच वेगवेगळ्या विषयांचे प्रकल्प पूर्ण करून जमा करण्याचा ससेमिरा मागे लागला आहे. विद्यार्थी उपहारगृह, महाविद्यालयातील कट्टे परिसरात गर्दी करत आहे. त्यांच्याकडून सामाजिक अंतर नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेकांच्या तोंडाला मुखपट्टी नसते, ती असलीच तर तोंडाखाली, कुठेतरी अडकवलेली असते. शैक्षणिक संस्थेच्या आवारात ही बेपर्वाई असतांना बस, रेल्वे स्थानके ही प्रवाश्यांच्या गर्दीने फु लली आहेत. मुखपट्टीविना प्रवेश नसलयची सुचना करूनही प्रवाश्यांना मुखपट्टीटा विसर पडत आहे. खिशातील रुमाल नाकाला लावत प्रवास होत आहे. सामाजिक अंतर नियमांचे सरळ उल्लंघन या ठिकाणी होते.

हे वाचले का?  Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगे यांच्या फेरीचा शांततेत समारोप

बाजार समितीच्या आवारात हमाल, व्यापारी यांच्याकडून सर्वच नियमांचे उल्लंघन होते. जड सामान उचलण्याच्या नादात हमालांना लागणारा दम पाहता मुखपट्टीचा वापर टाळला जातो. व्यापारी एका ठिकाणी बसत असल्याने मुखपट्टीचा त्यांना विसर पडतो. के वळ आपल्या टेबलाजवळ प्लास्टिक आच्छादन लावत अन्य नियमांना बाजार समितीच्या आवारात तिलांजली देण्यात येत आहे.

१२७ जणांकडून सव्वालाख रूपये दंड वसूल

मंगळवारी दुपारपर्यंत शहर परिसरात मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांकडून एक लाखाहून अधिक रक्कम  दंड सवरूपात वसूल करण्यात आली जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. महापालिके ने भरारी पथके  नेमत मंगल कार्यालय, सार्वजनिक कार्यक्र म, सार्वजनिक ठिकाणी जावून मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांविरूध्द कारवाई सुरू के ली आहे. मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात जमलेल्या अनेकांनी मुखपट्टी लावलेली नसल्याचे छायाचित्र महापालिके च्या गस्ती पथकाच्या अधिकाऱ्यांना व्हॉटसअपवर मिळाल्यानंतर गस्तीपथकाने आवारात दाखल होत कारवाई के ली. नाशिकरोड भागात २९ जणांकडून, नाशिक पश्चिाम ११, नाशिक पूर्व ४५, सिडको ११, पंचवटी १६, सातपूर १५ अशा १२७ जणांकडून प्रत्येकी एक हजार याप्रमाणे एक लाख २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

हे वाचले का?  नाशिक : माजी नगरसेविकेच्या घरी चोरी, एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास