मुलांचे लसीकरण लवकरच ; २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसवापराची तज्ज्ञ समितीची शिफारस

भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्या देशभरात घेण्यात आल्या होत्या

नवी दिल्ली : देशातील २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा मार्ग लवकरच मोकळा होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या वयोगटासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली आहे.

भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्या देशभरात घेण्यात आल्या होत्या. भारत बायोटेकने दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा तपशील केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेकडे सादर केला होता.https://7fc3227db4bf2a189e606c6659dfc1b4.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

हे वाचले का?  समुद्रातून डिझेल तस्करी करणारी टोळी जेरबंद; रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यासंदर्भातील तज्ज्ञ समितीने सोमवारी चाचण्यांच्या निष्कर्षांची पडताळणी केली. त्यानंतर काही अटींच्या अधीन राहून २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याचा निर्णय समितीने घेतला. आता त्यास अंतिम मंजुरी देण्याची शिफारस औषध महानियंत्रकांना करण्यात आली आहे.

याआधी २६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत कोव्हॅक्सिनच्या मुलांवरील दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीतील तपशिलाचा विचार करण्यात आला. त्यात या लशीची परिणामकारकता चांगली असल्याचे दिसून आले आहे. सोमवारच्या बैठकीत चाचण्यांच्या निष्कर्षांवर सखोल चर्चा करून मंजुरीचा निर्णय घेण्यात आला, असे समितीने म्हटले आहे. 

हे वाचले का?  Patanjali Ayurved : बाबा रामदेव यांच्यावरील ‘तो’ खटला अखेर संपला; पण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी संपवताना दिली तंबी!

औषध महानियंत्रकांच्या मंजुरीनंतर २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लशीचा वापर करण्याचा मार्ग मोकळा होईल. औषध महानियंत्रकांची मंजुरी ही औपचारिकता उरल्याने ही लस मुलांना लवकरच उपलब्ध होईल, असे मानले जाते.

मुलांसाठी लशीचाचण्या..

* याआधी भारताच्या औषध महानियंत्रकांनी १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी झायडस कॅडिलाच्या लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी दिली होती.

* तसेच १ सप्टेंबरला हैदराबादच्या बायोलॉजिकल ई-लिमिटेड कंपनीला ५ ते १८ वयोगटातील मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लसचाचण्या करण्यास औषध महानियंत्रकांनी परवानी दिली होती.

* जुलैमध्ये औषध महानियंत्रकांनी २ ते १७ वयोगटासाठी कोव्होव्हॅक्स लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास सीरम इन्स्टिटय़ूटला परवानगी दिली होती.