मोठा अपघात टळला: उड्डाण करताच एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकला आणि…

छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर (आज) मंगळवारी मोठा अपघात टळला

छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर (आज) मंगळवारी मोठा अपघात टळला. रायपूरहून एअर इंडियाचे विमान क्रमांक AIC ४६९ दिल्लीसाठी उड्डाण करताच, एक पक्षी विमानाला धडकला. ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यांनतर त्यानंतर लगेच विमान धावपट्टीवर परतले. सर्व प्रवासी सुरक्षितपणे विमानातून उतरले. केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंह देखील या विमानात होते, असे सांगितले जात आहे.

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

ही घटना धावपट्टी क्रमांक २४ वर सकाळी साडेदहा वाजता घडली. पायलटने हुशारीने विमान लॅंड केले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर, अभियंत्यांकडून फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाली का हे तपासण्यात आले.

रायपूर विमानतळाचे संचालक राकेश रंजन सहाय यांनी सांगितले की, AIC ४६९ या विमानाने १७९ प्रवाशांसह रायपूर वरुन दिल्लीसाठी सकाळी उड्डाण केले होते. त्यानंतर एक पक्षी विमानाला धडकला. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. या घटनेनंतर प्रवासी उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी धावपट्टीच्या तपासणीदरम्यान पक्ष्यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. एअर इंडियाचे अभियांत्रिकी कर्मचारी आणखी विमानाची तपासणी करत आहेत.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?