मोठा दिलासा! करोना रुग्णसंख्येत २४ तासांत प्रचंड घट, मृतांची संख्या झाली कमी

गेल्या काही महिन्यांपासून लाखांची दिवसागणिक लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांतील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केली असून, तब्बल एक ते दीड महिन्यानंतर रुग्णसंख्येची इतकी नीच्चांकी नोंद झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णसंख्येबरोबरच गेल्या २४ तासांत मृतांची संख्याही घटली आहे.

देशात करोना विषाणूनं जनजीवन वेठीस धरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं केंद्र सरकारकडून लॉकडाउनची कडक अमलबजावणी करण्यात आली. लॉकडाउन शिथिल केला जात असतानाच्या काळात रुग्णसंख्येनं मोठी उसळी घेतली होती. मात्र, आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.

हे वाचले का?  Patanjali Ayurved : बाबा रामदेव यांच्यावरील ‘तो’ खटला अखेर संपला; पण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी संपवताना दिली तंबी!

गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ३४२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ७१ लाख ७५ हजार ८८१ वर पोहोचली आहे. यात ८ लाख ३८ हजार ७२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर ६२ लाख २७ हजार २९६ रुग्ण उपचाराच्या मदतीनं करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८५६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

हे वाचले का?  जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!