मोदींच्या हस्ते हजारो कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी

देशभरातील १० वंदे भारत एक्स्प्रेस व इतर रेल्वे सेवांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला.

मुंबई : देशभरातील ८५ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या ६ हजार रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि देशभरातील १० वंदे भारत एक्स्प्रेस व इतर रेल्वे सेवांना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला.

देशभरातील ५० प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे, २२२ रेल्वे गुड्स शेड, ५१ गती शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल, दोन हजार ६४६ स्थानकांचे डिजिटीकरण, ३५ रेल्वे कार्यशाळा, लोको शेड, दुरूस्ती मार्गिका, कोचिंग आगार, ५० किमी रेल्वेचे दुहेरीकरण, १,०४५ किमीच्या ८० रेल्वे मार्गिकाचे स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग, ३५ रेल्वे कोट रेस्टॉरंट, दीड हजारांहून अधिक एक स्थानक – एक उत्पादन स्टॉल, ९७५ सौरऊर्जेवर चालणारी स्थानके व इमारती, २,१३५ किमी रेल्वे मार्गिकेचे विद्याुतीकरण, ४०१ किमी न्यू खुर्जा- सनेहवाल ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभाग, २४४ किमी न्यू मकरपुरा – न्यू घोलवड वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विभाग, अहमदाबाद येथे ऑपरेशन कंट्रोल सेंटर, फलटण – बारामती नवीन रेल्वे मार्गिका आणि ९ विद्याुत ट्रॅक्शन प्रणाली अद्यातन आदींची पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

अहमदाबाद – जामनगर ओखापर्यंत, अजमेर-दिल्ली सराय रोहिल्ला चंदीगडपर्यंत, गोरखपूर – लखनऊ प्रयागराजपर्यंत तिरुवअनंतपुरम – कासरगोड मंगळूरपर्यंत वाढवण्यात आली.

वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर – चेन्नई, लखनौ – देहराडून, कलबुरगी – बंगळुरू, रांची – वाराणसी, हजरत निजामुद्दीन – खजुराहो, सिकंदराबाद – विशाखापट्टणम, न्यू जलपाईगुडी – पाटणा, पाटणा- लखनौ, अहमदाबाद – मुंबई सेंट्रल आणि भुवनेश्वर – विशाखापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

राज्यातील ५०६ प्रकल्पांची पायाभरणी

महाराष्ट्रातील १५० एक स्थानक – एक उत्पादन स्टॉल, १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली, १३० सौरऊर्जा पॅनेल, १८ नवीन मार्गिका, दुहेरीकरण, १२ गुड्स शेड, ७ स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा, ४ गती शक्ती टर्मिनल आणि ३ विद्याुतीकरण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. तसेच लातूर येथील रेल्वे डबा कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो याचे लोकार्पण केले जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथे पाच जन औषधी केंद्रांचे उद्घाटन, नाशिक रोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे ४ रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.