या वेबसाईटवर दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे रामचरितमानस, भारतानंतर ‘या’ देशाचा ‘ऑनलाइन’ वाचण्यात दुसरा क्रमांक

रामचरित मानस भारतातनंतर सर्वाधिक अमेरिकेत ऑनलाईन वाचलं गेलं आहे.

श्रीरामचरित मानस हे गीता प्रेसच्या वेबसाईटवर दहा भाषांमध्ये अपलोड करण्यात आलं आहे. हिंदी, उडिया, नेपाळी, इंग्रजी, तेलुगु, कानडी, आसामी, गुजराती, मराठी आणि बांगला भाषांमध्ये हे रामायण या वेबसाईटवर वाचता येतं. अयोध्या दर्शन आणि अयोध्या महात्म्य ही दोन पुस्तकंही अपलोड करण्यात आली आहे. मागच्या आठ दिवसांत दहा लाखांहू अधिक लोकांनी ही पुस्तकं वाचली आहेत. तसंच १ लाख ३० हजार लोकांनी ही पुस्तकं ऑनलाईन वाचली आहेत. त्याचप्रमाणे ४ लाख १८ हजारांहून अधिक लोकांनी ही पुस्तकं डाऊनलोड केली आहेत.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

गीता प्रेसच्या वेबसाईटवर दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे रामचरित मानस

रामचरितमानस हे भारतानंतर सर्वाधिक अमेरिकेत वाचलं जातं आहे. श्रीरामचरितमानस हे संयुक्त अरब आमिरात आणि कुवेतमध्येही वाचलं गेलं आहे. ती संख्या कमी असली तरीही तिथल्या लोकांनी हे वाचलं आहे ही बाब विशेष म्हणावी लागेल. भारतात हिंदी रामचरित मानस मागच्या आठ दिवसांत ४४ हजार लोकांनी वाचलं आहे. अमेरिकेत २७०० लोकांनी तर कॅनडात ६०० हून अधिक लोकांनी वाचलं आहे. इंग्रजी भाषेतलं रामचरित मानस भारतात २० हजार, अमेरिकेत ३ हजार, कॅनडात ७००, संयुक्त अरब आमिरात मध्ये ३५० जर्मनीत १०० तर मलेशियात १०० लोकांनी वाचलं आहे.

हे वाचले का?  काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला आक्रमक, पाकिस्तानला इशारा देत म्हणाले…

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजली अयोध्या नगरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अमिताभ बच्चन, रजनीकांत, उद्योजक मुकेश अंबानी आणि गौतम अंबानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील शेकडो मान्यवर आणि साधुसंतांच्या साक्षीने नव्याने बांधलेल्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा मुख्य सोहळा सुरू होईल आणि सुमारे ४० मिनिटे चालेल. प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण होईल. कार्यक्रमासाठी निवडक लोकांनाच प्रवेश मिळणार असला तरी सोमवारी कोट्यवधी लोक दूरचित्रवाणी आणि ऑनलाइन माध्यमांतून हा सोहळा पाहण्याची अपेक्षा आहे. देशभरातील विविध मंदिरांमध्येही सोहळे आयोजित करण्यात आले आहेत.

हे वाचले का?  Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त