राज्यात आज ४४ हजारांहून अधिक नवीन ‘करोना’ बाधित ; २०० पेक्षा जास्त ‘ओमायक्रॉन’ बाधितही आढळले

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९८ टक्के आहे

राज्यात करोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. करोनाची तिसरी लाट आल्याचं दिसून येत आहे. करोना बरोबरच राज्यात दररोज ओमायक्रॉनचे नवीन रूग्ण देखील आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लावले जात आहेत. मात्र तरी देखील रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ४४ हजार ३८८ नवीन करोनाबाधित तर २०७ ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. याशिवाय, राज्यात आज दिवसभरात १२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

राज्यात आज दिवसभरात १५ हजार ३५१ रूग्ण करोनामुक्त देखील झाले आहेत. तर, राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या २,०२,२५९ आहे व आजपर्यंत राज्यात १, ४१, ६३९ करोनाबाधि रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आजपर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या १ हजार २१६ झालेली आहे. या पैकी ४५४ जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे.

हे वाचले का?  सांगली : नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने १७ जणांचे स्थलांतर

आजपर्यंत राज्यात ६५,७२,४३२ रूग्ण करोनातून बरे होऊ घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९८ टक्के आहे. तर, मृत्यू दर २.०४ टक्के आहे.

याशिवाय मुंबईत आज दिवसभरात १९ हजार ४७४ नवीन करोनाबाधित आढळले असून, ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,१७,४३४ वर पोहचली आहे. तर, पुण्यात आज दिवसभरात ४ हजार २९ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. सध्या शहरातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १४,८९० आहे.

हे वाचले का?  कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार