राज्यात डेल्टाचा धोका वाढतोय!; नाशिकमध्ये ३० रूग्ण आढळले

२८ रूग्ण ग्रामीण भागातील असल्याची नोंद

राज्यातील करोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नसता व तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेलेली असताना, आता डेल्टाचा धोका वाढताना दिसत आहे. नाशिकमध्ये ३० जणांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे समोर आले असून, यापैकी २८ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

तर, हे ३० रूग्ण डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे नमुने पुणे येथे जिनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा रूग्णालयामधील सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिली आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक करोना अपडेटमध्ये म्हटलंय. जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, २६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ४० लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असेही अपडेटमध्ये म्हटले आहे.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

मूळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.