रेल्वेचं तिकीट १० ते ५० रुपयांनी महागणार; आता स्थानकांच्या विकासाठी प्रवाशांकडूनच पैसे घेणार

प्रत्येक प्रवाशाकडून तो कोणत्या श्रेणीने प्रवास करत आहे यानुसार ही रक्कम किती असेल हे निश्चित केलं जाणार आहे.

भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासाठी तसेच पुन:बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा निधी आता टिकिटांवर अतिरिक्त पैसे आकारुन उभारला जाणार आहे. या पैशांना स्टेशन डेव्हलपमेंट फी (Station Development Fee) असं नाव देण्यात आलं आहे.

प्रत्येक प्रवाशाकडून तो कोणत्या श्रेणीने प्रवास करत आहे यानुसार ही रक्कम किती असेल हे निश्चित केलं जाणार आहे. सर्वासामान्यपणे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये (म्हणजेच फर्स्ट क्लास, एसी क्लास) प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक तिकीटामागे १० ते ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. हे शुल्क आकारण्यासंदर्भात रेल्वेने वेगवेगळे नियम निश्चित केले आहेत. यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे निर्देशक (प्रवासी विपणन) विपुल सिंघल यांनी एक अधिकृत पत्र जारी करुन माहिती दिलीय.

हे वाचले का?  Nita Ambani on Olympics in India: नीता अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्ती चिदम्बरम म्हणाले, “हे तर मोठं संकट ठरेल”; वाचा नेमकं काय झालं?

वेगवेगळ्या प्रमाणात ही एसडीएफ म्हणजेच स्टेशन डेव्हलपमेंट फीज आकारली जाणार आहे. पाहूयात कोणत्या श्रेणीसाठी किती पैसे आकारले जाणार आहेत…

उपनगरीय रेल्वे
उपनगरीय (एकावेळेच्या प्रवासाचं तिकीट) – ० रुपये
उपनगरीय रेल्वे (पास) – ० रुपये

आरक्षण न केलेले प्रवासी (उपनगरीय रेल्वे वगळता)
साधारण ट्रेन (सेकेण्ड क्लास) – १० रुपये
मेल/एक्सप्रेस ट्रेन (सेकेण्ड क्लास) – १० रुपये
फर्स्ट क्लास – १० रुपये
एसी एमईएमयू/डीईएमयू – १० रुपये

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

आरक्षण केलेले मात्र नॉन एसी (उपनगरीय रेल्वे वगळून)
सेकेण्ड क्लास – २५ रुपये
स्लीपर क्लास साधारण – २५ रुपये
स्लीपर क्लास (मेल किंवा एक्सप्रेस) – २५ रुपये
फर्स्ट क्लास – २५ रुपये

आरक्षण केलेले एसी क्लास
एसी चेअर क्लास ५० रुपये
एसी थ्री टीयर/ थ्री एसी इकनॉमी क्लास ५० रुपये
एसी टू टीयर ५० रुपये
एसी फर्स्ट क्लास/ईसी/ईए/एसी विस्टाडोम ५० रुपये