वस्तू व सेवा कर विभागाच्या इंदिरानगर कार्यालयात ४० हजार रुपये स्वीकारत असताना पाटील यांना पकडण्यात आले
नाशिक – चित्रीकरणासाठी आलेली वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर अधिकारी जगदीश पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.