‘…लाज वाटायला पाहिजे’, US Capitol मधील हिंसक आंदोलनात तिरंगा दिसल्याने शिवसेना खासदार संतापल्या

‘…लाज वाटायला पाहिजे’, US Capitol मधील हिंसक आंदोलनात तिरंगा दिसल्याने शिवसेना खासदार संतापल्या

अमेरिकेत काल(दि.८) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून जोरदार गोंधळ घातला. ट्रम्प समर्थक हजारोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यात चार आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. पण या सर्व घटनाक्रमामध्ये आंदोलकांपैकी एकाच्या हातात चक्क भारताचा तिरंगा झेंडा दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. त्यावरुन आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच संतापल्यात.

हे वाचले का?  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

आंदोलकांपैकी एकाच्या हातात तिरंगा दिसल्यानंतर, “जो कोणी भारतीय झेंडा फडकवतोय त्याला लाज वाटली पाहिजे. दुसर्‍या देशात सुरू असलेल्या हिंसक आणि गुन्हेगारी कृतीत सहभागी होण्यासाठी आमचा तिरंगा वापरू नका”, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. याशिवाय भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनीही या घटनेवर सवाल उपस्थित केलेत.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

वरुण गांधी यांनी ट्विटरद्वारे, तिथे भारताचा झेंडा का आहे? असा सवाल विचारलाय. ही एक अशी लढाई आहे ज्यामध्ये आपण सहभागी होण्याची नक्कीच आवश्यकता नाहीये असंही गांधी म्हणाले.