लाडकी बहीण योजनेत विरोधकांकडून गैरव्यवहार? अमोल मिटकरी म्हणाले, “सेतू केंद्रांवर एजंट सोडून…”

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला केंद्रीत अनेक योजना सुरू करणार असल्याचे घोषित केले. त्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही आणण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणीला महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे. परंतु, या योजनेसाठी गैरव्यवहार सुरू असल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यांनी याबाबत आज ट्वीट करून ही माहिती दिली.

हे वाचले का?  नाशिक : पालकमंत्री भुसे -भुजबळ प्रथमच समोरासमोर, लाडकी बहीण योजना आढावा बैठकीचे निमित्त

“राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी महिलांची होणारी धावपळ अखंड महाराष्ट्रामध्ये आहे. या धावपळीचा फायदा घेऊन विरोधकांकडून सेतू केंद्रावर एजंट सोडले गेले आहेत. तलाठी कार्यालयात २० रु, महासेवा केंद्रात प्रति १५० ते २०० रु आकारणी सुरू आहे”, असा गंभीर दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला केंद्रीत अनेक योजना सुरू करणार असल्याचे घोषित केले. त्यानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याकरता १ जुलैपासून नाव नोंदणी सुरू झाली आहे. परंतु, योजनेतील निकषांमुळे अर्ज भरण्यास महिलांना अडचणी येत आहेत.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान