विविध कार्यक्रमांनी आदिवासी आणि क्रोंती दिन साजरा

जिल्हा परिसरात आदिवासी आणि क्रोंती दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

आदिवासी नृत्य, परंपरा, संस्कृतीचे दर्शन, वृक्षारोपण, क्रांतिकारकांना अभिवादन

नाशिक : जिल्हा परिसरात आदिवासी आणि क्रोंती दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आदिवासी नृत्य, वृक्षारोपण, कार्यकर्त्यांचा सन्मान आदी कार्यक्रम घेण्यात आले.

पेठ तालुक्यातील बोरवठ येथे आदिवासी दिनानिमित्त बोरवठचे स्वातंत्र्यसेनानी अमृता पाटील, क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची प्रतिमा असलेले टी—शर्ट परिधान के लेले तरुण या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. रितेश खरे, दिशा फाउंडेशनचे  समन्वयक किरण काळे, एमआरईजीएसचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी ओमकार जाधव यांनी ‘आदिवासी संस्कृती आणि आव्हाने‘ यावर माहिती दिली. यावेळी सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे जिल्हा परिषद शाळा आणि मंगल कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पद्माकर कामडी, मधुकर पाटील, महादू महाले, येवाजी पवार, नाना गवळी, नामदेव आवारी आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मधुमालती, सिल्व्हर ओक, पाम ट्री, मोरपंखी, इंडियन ख्रिसमस ट्री, लंडन जुलिफर, बिटी अशी रोपे यावेळी लावण्यात आली. सोशल नेटवर्किंग फोरमचे ग्राम समन्वयक रोहिदास राऊत, मुख्याध्यापक पद्माकर भोये, भारती कुदळ, भास्कर गावीत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रमोद अहिरे यांनी केले.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

आदिवासी संस्कृती आणि परंपरांचे दर्शन

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे आदिवासी दिनानिमित्त संस्कृती आणि परंपरेतील तारपा, घांगळ भक्ती, डोंगऱ्या देव, माऊल्या, संबळ वाद्य, तूर वाद्य, मादळ याव्दारे आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी बिरसा मुंडा चौकातील फलकाचे अनावरण आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावीत, आदिवासी सेवक पुरस्कर्ते भिवा महाले यांच्या हस्ते करण्यात येऊन आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येऊन करोना काळात सेवा बजावणाऱ्या करोना योद्धा तसेच हरसूल भागातील विद्यार्थी,शिक्षक अशा गुणवंताचा सत्कार करण्यात आला. यात हरसूल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्राचे आरोग्यसेवक,सेविका तसेच आशा कार्यकर्ती, महावितरण कर्मचारी, हरसूल पोलीस ठाण्याचे कर्मचारी, गिर्यारोहक मनोहर हिलीम आदींचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी कौशल्या लहारे, सरपंच सविता गावीत, सामाजिक कार्यकर्त्यां भारती भोये आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

क्रांतिदिन साजरा

याशिवाय नाशिक शिक्षण संस्थेच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयात आदिवासी दिनासह क्रांतिदिन साजरा  करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षिका तोष्णा ठाकूर यांच्या सहकार्याने करण्यात आले. ठाकूर तसेच शालेय विद्यार्थिनी धनश्री बोरसे  यांनी या दोन्ही दिवसांची विद्यार्थ्यांंना माहिती दिली. प्रसंगी मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते , उपमुख्याध्यापिका मोहिनी तुरेकर, पर्यवेक्षक राजेंद्र कापसे, चिमन सहारे आदी उपस्थित होते. मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या वतीने क्रोंती दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वारली चित्रकला, आदिवासी संस्कृती, परंपरा आणि कला या विषयांवर आधारित चित्रे काढली. याविषयी विभाग प्रमुख नीता पाटील यांनी क्रोंतिकारकांचे विचार, त्यांची सहनशीलता, त्यांनी के लेला त्याग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा यासाठी हा उपक्र म घेण्यात आल्याचे सांगितले.

हे वाचले का?  नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

पेठ तसेच हरसूल परिसरात आदिवासी दिनानिमित्त नृत्यासह आदिवासी संस्कृती जोपासणारे कार्यक्रम झाले