शहरासह जिल्ह्यात वादळी पाऊस

नाशिक व दिंडोरी तालुक्यात गुरूवारी पावसाने हजेरी लावली. दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्ष बागांच्या छाटणीचे काम सुरू आहे.

दिंडोरी, सटाणा : नाशिक शहराच्या पंचवटी, मखमलाबाद या भागासह जिल्ह्यातील बागलाण, दिंडोरी तालुक्यात सायंकाळी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसाने सोयाबीन, बाजरी, नागली व इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. दिंडोरी तालुक्यात अकस्मात आलेल्या पावसाने द्राक्ष बागांच्या छाटणीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. नाशिक शहरात पावसाने काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

गेल्या २४ तासात जिल्ह्यात १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, बागलाण, निफाड या भागात पाऊस झाला. बागलाणमधील वग्रीपाडा, वाठोडा घुरमाळ, साळवण, केळझर गारमाळ, सुळबारी आदी गावांत पावसाने नुकसान झाले. अनेक शेतांना तळय़ाचे स्वरूप आले. सोयाबीन वाया गेले. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असतांना दुसरीकडे या तालुक्यातील कौतिकपाडे, भाक्षी, मुळाणे, वायगाव, चौगाव, कऱ्हे, रातीर, कोळीपाडा, दोधेश्वर, रातीर आदी गावांमध्ये त्याने दडी मारली आहे. परिसरातील पाझर तलावात पाणी नसून शेतकरी ट्रँकरने पाणी उपलब्ध करीत असल्याची माहिती कृउबा संचालक केशव मांडवडे, जिभाऊ मोरकर यांनी दिली.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

नाशिक व दिंडोरी तालुक्यात गुरूवारी पावसाने हजेरी लावली. दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्ष बागांच्या छाटणीचे काम सुरू आहे. अकस्मात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. नाशिक शहराच्या काही भागात एक तासापेक्षा अधिक वेळ वीज पुरवठा खंडित झाला.