शहरी भागांतील शाळा सुरू

भित्तिपत्रके, फलक लेखनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती

भित्तिपत्रके, फलक लेखनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती

पालघर : पालघर जिल्ह्यतील शहरी भागांतील नववी ते बारावी इयत्तांचे वर्ग सोमवारपासून अनेक ठिकाणी सुरू झाले. शासनाने दिलेल्या नियमावली व सूचनांचे पालन करण्यात येत असल्याचे दिसून आले.

मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू झाला आहे.    विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येऊन भित्तिपत्रके, फलक लेखन याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली.

वाडा येथील  पी. जे. हायस्कूलमध्ये नववी ते बारावीपर्यंतची विद्यार्थिसंख्या २२०० आहे. एका बाकडय़ावर एकाच विद्यार्थ्यांला बसवावे  लागत असल्याने वर्गखोल्या अपुऱ्या पडत आहेत. यामुळे येथील दहावी व बारावी या दोन वर्गाची शाळा सोमवार, बुधवार व शुक्रवार असे आठवडय़ातील तीन दिवस व नववी व अकरावीचे वर्ग मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस भरवले जाणार असल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांनी सांगितले. वाडा शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय, लिटल एंजल्स इंग्लिश विद्यालय या शाळांतील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

वसईत जेमतेम उपस्थिती

वसई : वसईत शाळा जरी सुरू  असल्या तरी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांंची जेमतेम उपस्थिती असल्याचे चित्र दिसून आले आहे. वसईत ४०३ नववी ते बारावी पर्यँत शिक्षण देत असलेल्या शाळा आहेत. या शाळेत १ लाख ८ हजार ५१५ इतकी विद्यार्थी संख्या आहे. परंतु  सोमवारी केवळ ६६ ठिकाणी शाळा सुरू झाल्या असून या सर्व शाळामध्ये मिळून  ६ हजार ५४५ इतक्याच विद्यार्थ्यांंची उपस्थिती होती. वसई पूर्वेतील जूचंद्र , चंद्रपाडा, कामण यासह इतर ठिकाणच्या भागात केवळ ५० ते ६० टक्केच विद्यार्थी उपस्थित होते.आलेल्या विदयार्थ्यांंकडून संमतीपत्र , आत प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्यांंचे हात र्निजतुकीकरण, मुखपट्टी, थर्मल तपासणी करून त्यांना वर्गात पाठविण्यात आले त्यानंतर शारीरिक दुरीकरणाचे सर्व नियमपाळून एका बाकावर एक विद्यार्थी  अशी बसण्याची आसन  व्यवस्था करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

हे वाचले का?  IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला