शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात

जिल्ह्य़ातील देवी मंदिरे घटस्थापनेसाठी सज्ज, पूर्वसंध्येला बाजारपेठही गजबजली

जिल्ह्य़ातील देवी मंदिरे घटस्थापनेसाठी सज्ज, पूर्वसंध्येला बाजारपेठही गजबजली

नाशिक : सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके..च्या मंत्रघोषात गुरूवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने शहरासह जिल्ह्यातील देवी मंदिरांमध्ये घटस्थापनेची तयारी अंतिम  टप्प्यात आली असतांना मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांचा उत्साह वाढला आहे. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठही सजली आहे. पूजेच्या सामानासह घटाच्या आराशीचे साहित्य भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे

शारदीय नवरात्रोत्सवात देवीचा जागर, कुमारी पूजन, कुंकूमार्चन असे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम उत्साहात होतात. दोन वर्षांपासून करोनाचे सावट कायम असल्याने नवरात्रोत्सवातही करोना संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी  झाल्याने भाविकांना उत्सव काळात देवी मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. मात्र नवरात्रोत्सवात यंदाही गरबा आणि दांडीयाला परवानगी नसल्याने दांडिया प्रेमीनी नाराजी व्यक्त केली. शिवाय भरमसाठ महागाईमुळे नागरिकातून खरेदीसाठी फारसा उत्साह दिसून येत नाही. फराळांच्या वस्तुंचे दर अगोदरच कडाडले आहेत. दुसरीकडे, घटस्थापनेसाठी लागणारा मातीचा कलश, पूजेची फुले, पाने, पाटी , देवीसाठी ओढणी यासह अन्य साहित्य, वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही करोनाचा धोका कायम आहे. नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर एकत्र येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे या काळात राज्य सरकारने गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रम  आयोजित करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. उत्सव काळात नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असल्याने शासनाने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या

हे वाचले का?  लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान

आहेत. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व मंदिरे उघडणार आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त पूजेच्या साहित्यासह इतर खरेदीकरिता महिलांनी केलेली गर्दी