शिर्डी मंदिरात आता पेहरावबंधन

तोकडय़ा कपडय़ांना संस्थानचा आक्षेप

तोकडय़ा कपडय़ांना संस्थानचा आक्षेप

सीताराम चांडे, लोकसत्ता

राहाता : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाताना भारतीय पोशाख बंधनकारक करण्यात आले असताना आता शिर्डीतील साईबाबा मंदिरातही भक्तांना पेहरावाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. भाविकांनी आक्षेपार्ह पोशाख करून दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आले. तोकडे कपडे परिधान केलेल्या भक्तांना दर्शन घेता येणार नाही.

हे वाचले का?  सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन

साई संस्थानच्या या निर्णयाचे शिर्डी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. मंदिरात दर्शनासाठी जाताना पोशाख किमान पूर्ण शरीर झाकणारा असावा अशी अपेक्षा आहे. मात्र अनेक भक्तगण तोकडे कपडे घालून येथे येत असल्याच्या तक्रारी साई मंदिर प्रशासनाकडे काही भाविकांनी केल्या होत्या. त्यामुळे साई संस्थान व्यवस्थापनाने मंदिरात जाताना पेहराव कसा असावा याचे फलक लावले आहेत. मंदिर प्रशासनाने उचललेले पाऊल भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे या निर्णयाच्या समर्थकांचे मत आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

निर्णय का?

साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून मोठय़ा प्रमाणात भक्त येतात. आता टाळेबंदीनंतर साई मंदिर खुले झाल्याने शिर्डीत गर्दी होत आहे. त्यामध्ये काही भक्त हे तोकडे कपडे घालून दर्शनाला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आल्यानंतर साई संस्थानने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे फलक जागोजागी लावले आहेत.