शिवसेनेचा भाजपाला धक्का; नाशकातील दोन बडे नेते स्वगृही परतणार

नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार

शिवसेना आज भाजपाला मोठा धक्का देणार आहे. नाशिकमधील दोन बडे नेते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नेत्यांची काल भेट घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे कळते. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.

वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नवा असून यांपैकी गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर होते. तर बागूल हे जिल्हा प्रमुख होते. मात्र, सध्या भाजपामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांकडून कळते. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ६.५२ टक्क्यांनी वाढ – ६९.१२ टक्के मतदान, मतटक्का वाढीत महिलांचा लक्षणीय हातभार

दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर गीते त्यांच्यासोबत गेले. पुढे ते मनसेकडून आमदारही झाले. त्यानंतर ते सत्ताधारी भाजपामध्ये सामिल झाले. तर बागूल शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादीत आणि नंतर भाजपात गेले. सुनील बागूल यांच्या आई नाशिक महापालिकेत सध्या भाजपाच्या उपमहापौर आहेत.