सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान; सहा राज्यांतील ५८ जागांचा समावेश; दिल्ली, हरियाणातील सर्व जागांवर मतदान

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे

या ५८ मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ कोटी महिला मतदारांचा समोवश आहे. निवडणूक आयोगाने १.१४ लाख मतदान केंद्रांवर सुमारे ११.४० लाख मतदान अधिकारी तैनात केले आहेत. सध्या देशाच्या अनेक भागांत तीव्र उकाडा जाणवत असून आधीच्या टप्प्यांमध्ये मतदारांना उन्हाचा त्रास झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकारी व राज्य यंत्रणांना पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

● ईशान्य दिल्ली : मनोज तिवारी (भाजप), कन्हैया कुमार (काँग्रेस)

● नवी दिल्ली : बांसुरी स्वराज (भाजप), सोमनाथ भारती (आप)

● चांदणी चौक (दिल्ली) : प्रवीण खंडेलवाल (भाजप), जे. पी. अग्रवाल (काँग्रेस)

● जौनपूर (उत्तर प्रदेश) :कृपाशंकर सिंह (भाजप), बाबूसिंह कुशवाह (सपा), श्यामसिंह यादव (बसप)

● आझमगड (उत्तर प्रदेश) : दिनेशलाल यादव (भाजप), धमेंद्र यादव (सपा)

हे वाचले का?  Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला

● कुरुक्षेत्र (हरियाणा) : नवीन जिंदाल (भाजप), सुशील गुप्ता (आप)

● सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : मनेका गांधी (भाजप), भीम निषाद (समाजवादी पक्ष), उदराज वर्मा (बसप)

● कर्नाल (हरियाणा) : मनोहरलाल खट्टर (भाजप), दिव्यांशु बुद्धिराजा (काँग्रेस)

● सिरसा (हरियाणा) : अशोक तनवार (भाजप), शैलजा कुमारी (काँग्रेस)

● संबलपूर (ओडिशा) : धमेंद्र प्रधान (भाजप), नागेंद्र कुमार प्रधान (काँग्रेस), प्रणव प्रकाश दास (बिजद)

● पुरी (ओडिशा) : संबित पात्रा (भाजप), जयनारायण पटनायक (काँग्रेस), अरुप पटनायक (बिजद)

● अनंतनाग-राजौरी (काश्मीर) : मेहबुबा मुफ्ती (पीडीपी), मियाँ अल्ताफ अहमद (नॅशनल कॉन्फरन्स), जफर मन्हास (अपनी पार्टी)

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

© The Indian Express (P) Ltd