सांगली : शिराळा, वाळवा तालुक्यात वादळी पाऊस

अचानक आलेल्या वादळी वारे आणि गारपीट पावसामुळे सांगलीच्या ऐतवडे खुर्दमध्ये दोन घरावर झाड पडून नुकसान झाले.

सांगली : अचानक आलेल्या वादळी वारे आणि गारपीट पावसामुळे सांगलीच्या ऐतवडे खुर्दमध्ये दोन घरावर झाड पडून नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम भागात हजेरी लावली असली तरी पूर्व भाग पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वैभव बाळासो दाइंगडे व दत्तात्रय शहाजी पाटील यांच्या वारणा शिक्षण संस्थेच्या शेजारी असणाऱ्या घरावर आज झालेल्या व अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट पावसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

शुक्रवारी दिवसभर उन्हाने लाहीलाही होत असताना सायंकाळी विजेच्या गडगडाटासह ऐतवडे खुर्दसह कुंडलवाडी चिकुर्डे देवर्डे आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये ऐतवडे खुर्दमधील दोन घरांवर झाडे पडल्याने भिंत पडून मोठे नुकसान झाले तर वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली. ऐतवडे खुर्द येथील रस्त्यालगत असणारे अनेक शेत वस्तीवरील पत्र्याचे छप्पर उडून गेले. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला असून हा पाऊस ऊस पिकाला वरदायी ठरणारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.