साताऱ्यासह महाबळेश्वर वाईमध्ये जोरदार पाऊस; अंबेनळी घाटात दरड कोसळली

मागील चोवीस तासात जोर ३११ मिमी महाबळेश्वर येथे २७६.५ मिमी तासात पावसाची नोंद नोंद करण्यात आली.

वाई: साताऱ्यासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी, कास पठार परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. महाबळेश्वर, तापोळा लामज, किल्ले प्रतापगड ,कांदाटी खोऱ्यात आणि जोर(ता वाई) येथील पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वहात आहेत. आंबेनळी घाटात रात्री दोन ठिकाणी दरड कोसळली. रात्री चिरेखिंडी तर सकाळी दबिल टोक या ठिकाणी दरड कोसळली. यामुळे महाबळेश्वर पोलादपूर वाहतूक ठप्प झाली आहे. पोलादपूर नजीक ठिकठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्प आहे.

बुधवारी सकाळी महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी साठल्याने वाहतूक संथ आहे. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. तर लिंगमळा परिसर देखील जलमय झाल्याचे पहावयास मिळाले. महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून शहर व परिसरात पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसात आजही जोरदार वाऱ्यासह पावसाने अक्षरश: झोडपून काढले

हे वाचले का?  Creamy Layer : “अनुसूचित जातींचे आरक्षण हळूहळू संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट”, क्रिमीलेअरबाबत प्रकाश आंबेडकरांची सूचक पोस्ट

मागील चोवीस तासात जोर ३११ मिमी महाबळेश्वर येथे २७६.५ मिमी तासात पावसाची नोंद नोंद करण्यात आली. दरम्यान संततधार पावसाने बुधवारी वेण्णालेक महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर ठिकठिकणी जलमय रस्त्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

वाई तालुक्यातील जोर जांभळी परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धोम बलकवडी धरण २.६९ टीएमसी ६९. ७३६ टक्के भरले आहे. धोम धरण ५.४४ टीएमसी ४०.२९ टक्के पाणी साठ्यात वाढ झाली आहे. वेण्णा नदीला पूर आला आहे. सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाने ओढे नाले तुडूंब भरून वाहत आहेत.रस्त्यावर पाणी साठले आहे.पुणे बंगळूर महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरु आहे.पावसाने ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील भुयारी मार्ग ( ग्रेड सेपरेटर) पावसामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कास पठार परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तेथील धबधबे ओसंडून वाहत आहेत. अद्याप पर्यंत पावसाने पडझडीची अथवा रस्ते पूल साकव वाहून गेल्याची माहिती मिळालेली नाही.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर