सावधान! राज्यात ‘ऑरेंज’ व ‘यलो अलर्ट’, पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांत आज मूसळधार

भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मूसळधार पावसाचा (ऑरेंज व यलो अलर्ट) इशारा दिला आहे.

नागपूर : महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने ठाण मांडले असून राज्यातील विविध भागात त्यामुळे शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचेदेखील मोठे नुकसान केले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मूसळधार पावसाचा (ऑरेंज व यलो अलर्ट) इशारा दिला आहे.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, बीडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या शहरांना पिवळा अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

एक मे रोजी विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठीही ‘पिवळा अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकण वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून दोन मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.