“हामुन” चक्रीवादळ बनले धोकादायक! “या” पाच राज्यांवर आज होणार परिणाम

येत्या बारा तासांत त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नागपूर: देशात पहिल्यांदाच एकाच वेळी अरबी समुद्रात “तेज” आणि बंगालच्या उपसागरात “हामुन” अशा दोन चक्रीवादळाची निर्मिती झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात बांगलादेशजवळ सक्रिय असलेले चक्रीवादळ ‘हामून’ धोकादायक बनले आहे. त्याच्या प्रभावामुळे आज देशातील पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे वाचले का?  पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक

येत्या बारा तासांत त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. २५ ऑक्टोबरला दुपारी या चक्रीवादळाने चितगावच्या दक्षिणेला बांगलादेश किनारा ओलांडला होता. त्याचा वाऱ्याचा वेग ताशी ७५ ते ८५ किमी राहील. सध्या हे वादळ कमकुवत होऊन खोल दबावात रूपांतरित झाले आहे.

हे वादळ आज कमकुवत होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याच बरोबर आणखी एक समान चक्रीवादळ आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरावर समुद्रसपाटीपासून १.५ ते ३.१ किमी उंचीवर असल्याचे देखील हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या २४ तासात लक्षद्वीप, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये हलका पाऊस झाला.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव