१४ ऑक्टोंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही

शनिवार १४ ऑक्टोंबर रोजी जगातील उत्तर-मध्य आणि दक्षिण अमेरिका, अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया आणि ब्राझील येथून हे ग्रहण कुठे कांकनाकृती किंवा खग्रास दिसणार आहे, परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.

चंद्रपूर : शनिवार १४ ऑक्टोंबर रोजी जगातील उत्तर-मध्य आणि दक्षिण अमेरिका, अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया आणि ब्राझील येथून हे ग्रहण कुठे कांकनाकृती किंवा खग्रास दिसणार आहे, परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी ८.३३ वा सुरू होऊन २.२६ वाजता संपेल. हे यावर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण असेल. ह्या पूर्वी २० एप्रिल रोजी आंशिक सूर्यग्रहण घडले होते.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

२८ ऑक्टोबर रोजी रात्री घडणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारत, महाराष्ट्रातून दिसेल. ह्या पूर्वी ५ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण झाले होते. २८ऑक्टोबर चे ग्रहण वर्षातील शेवटचे ग्रहण असेल.हे ग्रहण जगातील युरोप, आशिया, आष्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतुन दिसेल. ग्रहणाची सुरवात रात्री ०१.०५ मिनिटाने सुरुवात होईल,ग्रहण मध्य ०१.४४ तर ग्रहण २.२२ वाजता संपेल. आंशिक ग्रहणाचा चंद्र केवळ १०%झाकला जाइल.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

ऑक्टोंबरमध्ये उल्कावर्षाव

९ ऑक्टोबरला ड्राकोनिड उल्कावर्षाव, १८ ऑक्टोबरला जेमिनिड उल्कावर्षाव, २२ ऑक्टोबरला ओरिओनीड उल्कावर्षाव, २५ ऑक्टोबरला लिओनीड उल्कावर्षाव पहावयास मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात इतक्या खगोलीय घटना पाहण्याची ही संधी अनेक वर्षांनंतर आली आहे. खगोल अभ्यासकांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच गृपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.

हे वाचले का?  “झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप