२० वर्षांतील चांद्रमोहिमेचे यश

तिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे पीएसएलव्ही-सी ११ तयार करण्यात आले होते.

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) ‘चंद्रयान-३’ चंद्रावर झेपावण्यासाठी सज्ज झाले असून आज, शुक्रवारी दुपारी या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. २००३ मध्ये चांद्रयानाची घोषणा झाल्यानंतर गेल्या २० वर्षांत देशाची चांद्रमोहीम विकसित होत गेली. देशाच्या चांद्रमोहिमेचा आढावा..

चंद्रयान-१

* भारत सरकारने २००३ मध्ये चंद्रयान ही संकल्पना तयार केली. त्यानंतर १५ ऑगस्ट २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी औपचारिकपणे देशाच्या चांद्रमोहिमेची घोषणा केली.

* २२ ऑक्टोबर २००८ रोजी ‘इस्रो’ने पीएसएलव्ही-सी ११ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान-१’चे यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही-सी ११ ही पीएसएलव्हीच्या मानक कॉन्फिगरेशनची अद्ययावत आवृत्ती होती. लिफ्ट-ऑफच्या वेळी ३२० टन वजनाच्या वाहनाने उच्च पेलोड क्षमता प्राप्त करण्यासाठी मोठय़ा स्ट्रॅप-ऑन मोटरचा वापर केला. तिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे पीएसएलव्ही-सी ११ तयार करण्यात आले होते.

हे वाचले का?  पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गुप्त भुयार? पुरातत्त्व खात्याकडून होणार पडताळणी..

* पहिल्या चंद्रयानात भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरिया येथे तयार केलेली ११ वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्यात आली. तमिळनाडूतील प्रख्यात शास्त्रज्ञ मायिलसामी अन्नदुराई यांनी ‘चंद्रयान-१’चे मोहिमेचे नेतृत्व केले.

* चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे यान चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवर चंद्राभोवती फिरत होते.

* मोहिमेने सर्व इच्छित उद्दिष्टे साध्य केली असताना प्रक्षेपणानंतर काही महिन्यांनी मे २००९ मध्ये अवकाशयानाची कक्षा २०० किलोमीटपर्यंत वाढविण्यात आली. 

* चंद्रयान-१ने चंद्राभोवती ३,४०० पेक्षा जास्त प्रदक्षिणा केल्या. २९ ऑगस्ट २००९ रोजी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या अंतराळ यानाचा संपर्क तुटल्याचे घोषित केल्यामुळे या मोहिमेचा शेवट झाला.  

चंद्रयान-२

* चंद्रयान-१च्या यशानंतर भारताने चंद्रयान-२ ही मोहीम हाती घेतली. ही इस्रोची अधिक जटिल मोहीम होती, कारण त्यात चंद्राच्या अनपेक्षित दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्यासाठी ऑर्बिटर, लँडर (विक्रम), रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश होता.

हे वाचले का?  Supreme Court : बांगलादेशातून भारतात आलेल्या लोकांना ‘ओळख’ मिळणार? कलम 6 A बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तरी काय?

* २२ जुलै २०१९ रोजी श्रीहरिकोटा येथील अवकाश केंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (जीएसएलव्ही एमके ३- एम१) यांद्वारे चंद्रयान-२ प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपण केल्यानंतर याच वर्षी २० ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या समाविष्ट करण्यात आले. लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर लँिडगच्या तयारीसाठी ऑर्बिटरपासून यशस्वीरीत्या वेगळे झाल्यामुळे अंतराळयानाची प्रत्येक हालचाल अचूक होती.

* १०० किलोमीटर उंचीवर चंद्राभोवती प्रदक्षिणा केल्यानंतर लँडरचे उतरणे नियोजित प्रमाणे होते. ७ सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार १:५२ वाजता हे यान उतरत असताना चंद्राच्या पृष्ठभागापासून २,१०० मीटर उंचीवर होते, त्या वेळी विक्रम लँडरशी शास्त्रज्ञांचा  संपर्क तुटला. हे यान कोसळले असल्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  Cabinet Meeting : नगराध्यक्षांचा कालावधी वाढवणार, यासह राज्याच्या मंत्रिमंडळात आठ महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!

* चंद्रयान-२ मोहीम

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरल्याने इस्रोचे शास्त्रज्ञ निराश झाले. या दुर्मीळ पराक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी इस्रो मुख्यालयात उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांत्वन केलेले तत्कालीन इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या भावनिक प्रतिमा आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.