७२१ फूट उंचीचे जगातील सर्वोच्च राम मंदिर भारतात नाही तर ‘या’ देशात होणार पूर्ण! वैशिष्ट्य व खर्च जाणून व्हाल थक्क

World’s Tallest Ram Mandir: अयोध्या नगरीतील राम मंदिराची जगभरात धामधूम असताना आता प्रभू रामाच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे.

World’s Tallest Ram Mandir: अयोध्या नगरीतील राम मंदिराची जगभरात धामधूम असताना आता ऑस्ट्रेलियामधून प्रभू रामाच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय श्री राम वैदिक आणि सांस्कृतिक संघटना (International ShriRam Vedic And Cultural Union Inc.) यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ISVACU पर्थ (पश्चिम ऑस्ट्रेलिया) मध्ये भव्य श्री राम मंदिर बांधणार आहे. प्रभू राम मंदिर प्रकल्प हा केवळ मंदिराची वास्तूच नव्हे तर त्याहून अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती ISVACU च्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातील राम मंदिराच्या वास्तूचा प्राथमिक आराखडा सुद्धा संघटनेतर्फे दाखवण्यात आला आहे.

हे वाचले का?  सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

प्राप्त माहितीनुसार, या मंदिरात योग आणि ध्यान केंद्र, सांस्कृतिक केंद्र, अतिथी गृह, वेदपाठ सेंटर, बहुकार्यात्मक कम्युनिटी हॉल, परमार्थ रसोई (सामुदायिक स्वयंपाकघर), आर्ट गॅलरी आणि प्राचीन पुस्तके, लिपी, रामायण आणि इतर प्रकाशनांची लायब्ररी यांचा समावेश असेल. या मंदिरात भविष्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसह सर्वांगीण कल्याणासाठी उपक्रम सुद्धा आयोजित केले जाणार असल्याचे समजतेय. या मंदिरात सण साजरे करून भक्तीचा आनंद लुटण्याची संधी प्रत्येकाला देण्याचा या संघटनेचा मानस असल्याचे सांगण्यात येतेय.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

ISVACU ने नमूद केल्याप्रमाणे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचितांना शिष्यवृत्ती व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकार आणि नागरिकांना मदत पुरवण्यासाठी मंदिराच्या निधीचा वापर केला जाणार आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याची वास्तू अत्यंत भव्य दिव्य असणार आहे. साधारण ६०० कोटींचा खर्च या मंदिराच्या बांधकामासाठी अपेक्षित आहे. ७२१ फूट उंचीचे हे जगातील सर्वात उंच राम मंदिर असेल अशी माहिती सध्या समोर येत आहे.

दुसरीकडे भारतातील बहुचर्चित अयोध्या नगरीतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील गाभाऱ्यात नुकतीच रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. २२ जानेवारीला भारतात श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा मोठा सोहळा पार पडणार आहे यावेळी प्रभू राम व सीता मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.