अकरावीच्या तिसऱ्या फे रीत ४,१११ विद्यार्थ्यांना संधी

चौथ्या फेरीत प्रवेश प्रक्रिया अर्ज भाग दोन पुन्हा नव्याने भरण्यात येणार

चौथ्या फेरीत प्रवेश प्रक्रिया अर्ज भाग दोन पुन्हा नव्याने भरण्यात येणार

नाशिक : सहा महिन्यांपासून इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रि या रखडली असताना मंगळवारी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. याअंतर्गत चार हजार १११ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. चौथ्या फे रीत प्रवेश प्रकिया अर्ज भाग दोन पुन्हा नव्याने भरण्यात येणार असल्याने त्यानंतरच प्रवेश प्रक्रि येचे चित्र स्पष्ट होणार आहे.

११ वी प्रवेश प्रक्रि या हे महाविद्यालयीन विश्वात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत असते. विशिष्ट महाविद्यालयाचा आग्रह, गुणवत्ता यादी, पालकांची आर्थिक क्षमता आणि विद्यार्थ्यांचे गुणपत्रक या चतु:सूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होतो. यंदा मात्र करोना संसर्ग तसेच मराठा आरक्षण या विषयांमुळे ही प्रवेश प्रक्रि या इयत्ता १० वीचा निकाल लागून पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप पूर्ण झालेली नाही.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

३१ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा दिल्यानंतर ११ वी प्रवेशासाठी नोंदणी के ली होती. त्यापैकी २६ हजार ३८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रि येचा पहिला अर्ज भरला. इयत्ता १० वीच्या निकालानंतर २३ हजार ५३० विद्यार्थ्यांनी भाग दोन भरत महाविद्यालयाची पसंती कळवली. जिल्ह्य़ात ११ वी प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, किमान कौशल्य याअंतर्गत एकू ण २५ हजार २७० जागा उपलब्ध आहेत. दुसऱ्या गुणवत्ता यादीपर्यंत के वळ १० हजार ९०९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित के ले.

करोना संसर्गाचा परिणाम तसेच विद्यार्थ्यांकडून एका विशिष्ट महाविद्यालयाचा आग्रह धरला जात असल्याने तेच तेच विद्यार्थी यादीत समाविष्ट होत असल्याचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितले. चौथ्या यादीत प्रवेश प्रक्रि येचा दुसरा भाग नव्याने भरण्यात येणार आहे. यामुळे किती विद्यार्थी, किती जागा हे चित्र अधिक स्पष्ट होईल. यंदा वाणिज्य इंग्रजीकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे.

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

मंगळवारी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. या अंतर्गत ४१११ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्यापैकी ७२२ विद्यार्थी कला शाखेसाठी, एक हजार ३६६ विद्यार्थी वाणिज्य तर एक हजार ९७१ विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी पात्र आहेत. ५२ विद्यार्थी किमान कौशल्यसाठी पात्र राहतील, असे उपासनी यांनी नमूद केले.

शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये तिसऱ्या यादीत

किती टक्क्यांना कोणत्या शाखेचे प्रवेश बंद झाले त्याची माहिती

*    के .टी.एच.एम.  महाविद्यालय ६९.६० टक्के  कला, ८७.४० वाणिज्य, विज्ञान ९१.४०

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

*    बी.वाय.के . महाविद्यालय वाणिज्य ८८.२०

*    एच.पी.टी. कला महाविद्यालय ८८.२०

*    आर.वाय.के . विज्ञान महाविद्यालय ९१.४०

*    पंचवटी महाविद्यालय ६५.६० कला, ६९.८० वाणिज्य, ८६.८० विज्ञान

*    भोसला महाविद्यालय ६८.४० कला, ८५.८५ वाणिज्य, ८९.९० विज्ञान