अफगाण नागरिकांना देशाबाहेर जाऊ देणार नाही; तालिबान्यांची घोषणा

इतर देश मात्र आपल्या नागरिकांना काबूल विमानतळावरुन घेऊन जाऊ शकतात, असं तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने सांगितलं.

अफगाणिस्तानातली परिस्थिती सध्या जगभरासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर आता अफगाणिस्तानचं भविष्य काय? असा प्रश्न जगापुढे आहे. अशातच तालिबानी दररोज वेगवेगळे आदेश देत आहेत, फतवे काढत आहेत. त्यावरुन या प्रश्नाची गंभीरता अधोरेखित होत आहे. आताही तालिबान्यांनी एक नवी घोषणा दिली आहे.
तालिबान्यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदने सांगितलं की, यापुढे अफगाण नागरिकांना आता देशाबाहेर जाता येणार नाही. बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी विमाने जिथे उतरत आहेत, त्या काबूल विमानतळावर आता अफगाण नागरिकांना जाऊ दिलं जाणार नाही.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

याबद्दल सीएनएनने दिलेल्या बातमीमध्ये सांगितलं आहे की, या विमानतळाकडे जाणारा रस्ता अफगाण नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, इतर देशातील नागरिक ह्या रस्त्याने जाऊ शकतात आणि आपापल्या देशाच्या विमानांनी आपल्या देशातही जाऊ शकतात, अशी माहिती तालिबान्यांकडून देण्यात आली.

तालिबानने सांगितलं की, अफगाण नागरिक बाहेर जाऊ लागल्याने आम्हीही नाखूश आहोत. इथल्या डॉक्टरांनी तसंच शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासकांनी देश सोडून जाऊ नये. त्यांनी इथेच राहून आपापल्या क्षेत्रात काम करावं.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा