अभिनव भारत मंदिरच्या विकास निधीवरून संघर्ष

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी येथे वास्तव्यास असताना अभिनव भारत संस्थेची स्थापना करून अनेक आंदोलनांचे रणिशग फुंकले होते.

सेना खासदाराकडून आमदारांच्या हक्कावर गदा आल्याचा आरोप

नाशिक : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराच्या नूतनीकरणासाठी शासनाने मंजूर केलेल्या अतिरिक्त पाच कोटींच्या निधीवरून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यात उफाळलेल्या संघर्षांचे पडसाद बुधवारी थेट विधानसभेच्या अधिवेशनात उमटले. प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेला विषय आपल्या पाठपुराव्यामुळे मागील भाजप सरकारच्या काळात मार्गी लागला. एक कोटीचा निधी उपलब्ध होऊन त्याचे काम प्रगतिपथावर आहे. वाढीव निधीसाठी आपण पाठपुरावा केला असताना त्याचे श्रेय घेण्याचा सेना खासदार हेमंत गोडसे यांचा प्रयत्न म्हणजे आमदारांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे टिकास्त्र आमदार फरांदे यांनी सोडले. यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.https://f9d656b239cf45c28eaa20f5680b90df.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

हे वाचले का?  नाशिक महापालिकेची सिटीलिंक बससेवा पावणेदोन वर्षात १० वेळा ठप्प; पगार वाढीसाठी चालक संपावर, हजारो विद्यार्थी, प्रवासी वेठीस

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी येथे वास्तव्यास असताना अभिनव भारत संस्थेची स्थापना करून अनेक आंदोलनांचे रणिशग फुंकले होते. इंग्रजांच्या विरोधातील रणनीतीचे केंद्र म्हणून या संस्थेच्या कार्यालयाची ओळख झाली होती. या मंदिराच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा म्हणून पर्यटनमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पर्यटन खाते शिवसेनेकडे आहे. त्याचा आधार घेत सेना खासदार आणि अन्य पदाधिकारी स्थानिक आमदारांनी सुचविलेल्या कामांचे श्रेय लाटत असल्याचा आरोप फरांदे यांनी विधानसभेत केला. अभिनव भारत मंदिराच्या विकासकामांसाठी अतिरिक्त निधी देण्याचा प्रस्ताव आपण जिल्हा प्रशासनामार्फत पाठविला होता. पर्यटनमंत्र्यांची भेट घेऊन निधी देण्याचा आग्रह धरला. पर्यटन विकास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २३ कामांच्या यादीत प्रस्तावांसमोर सेना पदाधिकारी, अभिनव भारत मंदिरच्या प्रस्तावासमोर सेना खासदाराचे नाव आहे. शासनाकडून आमदारांच्या हक्कांवर गदा आणली जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला. यावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जसे प्रस्ताव येतात, तशी कार्यवाही केली जाते, फरांदे यांच्या पत्रानुसार निधी दिला जाणार असल्याचे नमूद केले.

हे वाचले का?  इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता

खासदार हेमंत गोडसे यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा जनतेची कामे करावीत. अभिनव भारत मंदिरासाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर करून आपण पाठपुरावाही केला. खासदार गोडसे यांनी कुठलीही प्रक्रिया न करता, अभिनव भारत मंदिरला भेटदेखील न देता परस्पर मंजूर झालेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे.-

 – देवयानी फरांदे (आमदारभाजप)

अभिनव भारत मंदिराचे अत्याधुनीकरण व्हावे, सावरकर यांच्या विविध दुर्मीळ वस्तू, छायाचित्रे, त्यांची पुस्तके आणि ज्ञानसंपदेचे जतन करण्यासाठी निधीची गरज होती. अभिनव भारत मंदिराच्या विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी पर्यटनमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानुसार पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून यामुळे अभिनव भारत मंदिराला नवीन रूप मिळणार आहे.

हे वाचले का?  नाशिक: स्वस्त धान्य पुरवठ्यास तांत्रिक बिघाडाचा फटका

– हेमंत गोडसे (खासदारशिवसेना)