अवैध गॅस अड्ड्यावर छापा ११ लाखाचा मुद्देमाल जप्त

देवळा तालुक्यात घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरुन देणाऱ्या अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून १३६ सिलेंडर जप्त केले
नाशिक : देवळा तालुक्यात घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरुन देणाऱ्या अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून १३६ सिलेंडर, दोन चारचाकी वाहने आणि गॅस भरण्याची साधनसामग्री असा ११ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर परिसरात काही संशयित हे घरगुती गॅस व्यावसायिक कारणांसाठी असलेल्या निळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या भरुन देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली. पथकाने छापा टाकला. भागवत जाधव (४२, रा. सुभाषनगर) या संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला. छाप्यात घरगुती वापराचे १०१ सिलेंडर, निळ्या रंगाचे ३५ सिलेंडर असे एकूण १३६ गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पंप, इलेक्ट्रॉनिक मोटार तसेच दोन चारचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केला.

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा